आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > आरोग्य

                 आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून तो एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोल आहे. आहार, पोषण, स्वच्छता, व्यायाम इ. गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. प्रत्येक बालकाला पुरेशी निगा आणि योग्य पोषाहार मिळणं त्यांची वाढ आणि विकास यांच्यावर देखरेख ठेवणं, त्यातील बदल शोधून काढणं आणि त्यावर वेळीच उपचार करणं अतिशय महत्वाचे आहे.

         आरोग्य या सदरात बाळांची, मुलांची काळजी कशी घ्यावी याची सखोल माहिती, छोट्या छोट्या टिप्स, सल्ले, लेख माध्यमातून पुरवणार आहोत. दैनंदिन जीवनात या टिप्स अतिशय उपयुक्त ठरू शकतील. तसेच संवाद सेतूही साधणार आहोत. आपणाकडून अधिकाधिक सहकार्याची अपेक्षा आहे.

  उपयुक्त टिप्स:

 • रोज झोपण्यापूर्वी आपले डोळे गुलाब पाण्याने स्वच्छ करा, तुमचे डोळे स्वछ आणि चमकदार होतील.
 • थंडीच्या दिवसात आपल्या तान्हुल्याला तिळाच्या तेलानेच मालीश करावी, त्याने बाळाला ऊब मिळते.
 • तुम्हाला मुलांना जितका आनंद, प्रेम देता येईल तितके द्या. मुलांशी बोलुन, हसुन, खेळुन त्यांना प्रेमाने कुरवाळुन त्यांचा पापा घेत मौजमस्ती केली पाहिजे त्याने मुल किरकीरे होत नाही.
 • मुलांना लहानपणापासूनच खेळून आल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर साबणानी हात धुणे, स्वच्छता पाळणे अशा आरोग्यासाठी चांगल्या सवयी लावाव्यात.
 • एकटे असताना मोक्याच्या क्षणी काय करावे ह्या विषयीसुद्धा मुलांशी चर्चा करावी.
 • मुलांशी बोलणे व त्यांचे म्हणणे लक्षपुर्वक ऐकणे हा पालकांनी मुलांशी संवाद साधण्याचा उत्तम मार्ग आहे.
 • शिस्त लावण्यासाठी लालुच आमिष दाखविणे फारसे उपयोगाचे नाही. त्याने केलेल्या चांगल्या कृत्याबद्दल त्याची प्रेमाने पाठ थोपटली पाहिजे. असे केल्याने मुलंही चांगला प्रतिसाद देतात.
 • बाळाला सर्दी होत असल्याचे लक्षात येताच त्याच्या गळ्यात ओवा व २-३ लसणाच्या पाकळ्यांची छोटीशी पुडी बांधावी. लसूण ओव्याच्या वासाने सर्दी वाढत नाही.
 • नित्यनेमाने सफरचंदाचे सेवन केल्यास व्यक्तीचा अनेक दुर्धर आजारांपासून बचाव होऊ शकतो. सफरचंदामध्ये आढळून येणारे अँटीऑक्सीडंट रक्तवहनास मदत करते. त्यामुळे व्यक्तीचा कर्करोग, अल्झायमर आणि मधुमेहासारख्या दुर्धर आजारांपासून बचाव होऊ शकतो.
 • कपड्यांप्रमाणेच उन्हाळ्यात आहाराकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. उन्हामुळे भूक मंदावते. शरीराकडून पाण्याची अधिक प्रमाणात मागणी केली जाते. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याबरोबरच हलका आहार घ्यावा. उष्ण पदार्थांचे सेवन टाळून शीत गुणधर्म असलेली फळे व पेये घ्यावीत. 
 • उन्हातून घरात आल्या आल्या फ्रीज मधील पाणी न देत छोटा गुळाचा खडा व साधे माठातील पाणी द्यावे. 
 • उन्हाळ्यात रात्री १ चमचा धने पाण्यात भिजवून ठेवावे सकाळी गाळून गुळ घालून ते पाणी पिण्यास द्यावे. 
 • कडुलिंब डहाळी पाण्यात उकळून ते पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळावे. 
 • नाचणी सत्व, ज्वारीच्या लाह्या, सातूचे पीठ आहारात ठेवावे. 
 • कोल्ड ड्रिंक टाळून त्या ऐवजी नारळ पाणी, उसाचा रस, कोकम, ताक, लिंबू-पाणी याचा वापर करावा. 
  • आषाढ, श्रावण, भाद्रपद या काळात आपली पचनशक्ती कमी असते. त्यामुळं शक्यतो आहार प्रमाणापेक्षा कमीच घ्यावा. 
  • मीठ आणि आंबट कमी असलेलं जेवण घ्यावं. लोणचे, चटणी, दही, अतितिखट या गोष्टी टाळायला हव्यात. 
  • उकडलेल्या भाज्या, पालेभाज्या न घेता फळभाज्यांवर भर द्यावा उदा. भोपळा, दुधी. आहारात मुगाची डाळ, खिचडी, मका या गोष्टी यायला हव्यात. 
  • हिरव्या पालेभाज्यांतून जंतुसंसर्गाची अधिक शक्यता असल्यानं या पालेभाज्या टाळाव्यात. 
  • भेळपुरी, पाणीपुरी असे उघड्यावरचे पदार्थ तर पूर्णत: बंद करावेत. 
  • जेवणात लसूण, आलं, मिरी, हिंग, जिरे, हळद, कोथिंबीर या गोष्टी असाव्यात. 
  • पाणी उकळूनच प्यावं. त्याचप्रमाणे नॉनव्हेज शक्यतो टाळायला हवं. पूर्ण भूक लागल्याशिवाय खाऊ नये.
  • पावसाळ्यात दुपारची झोप टाळावी. कारण यामुळं शरीरात अतिरिक्त पित्त वाढण्याची शक्यता असते.