आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > खटयाळ बालपण > ओळ्खा पाहु
December 7, 2012

नारळ

पल्लवी शुक्ला

नारळ

माड किंवा नारळ (Coconut) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. याचे फळनारळ या नावाने ओळखले जाते.

सुमारे ३० मीटर उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुऱ्यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाचे अनेक उपयोग आहेत.

 

ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंडखनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते.