आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > खटयाळ बालपण > ओळ्खा पाहु
January 9, 2013

पतंग

व्यवस्थापक

पतंग

उंच झोका घेई आकाशी
पण नाही  विमान नाही पक्षी
रंगीबेरंगी कागदाचा
मुलांच्या आवडीचा
मी कोण बरे ?

              मी आहे पतंग 
    
              पतंग पातळ ताव व बांबूच्या कामट्या वापरुन बनवितात.हिला दोऱ्याच्या सहायाने आकाशात उडविले जाते.

 संक्रांत काळ हे पतंग पर्व. पतंगाचा शोध सर्व प्रथम जपानमध्ये लागला. तेथे वर्षातून एक-दिवस पतंग - दिन मानला जातो. निरनिराळ्या आकार - प्रकारचे ... रंगांचे पतंग लाल दीप प्रज्वलित करून आकाशात उंचच उंच उडत असतात, जणू आकांशापुढति गगन ठेंगणे ! गुजरातमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पतंग स्पर्धा आयोजित होतात.


पतंग उंच गगनात,
अन डोर चिमण्या हातात !

गरगर फिरते आसारी,
भरभर घेते भरारी !

हवेचा झोका झोकात,
गोता खातोय झाडात !

ढील देऊन जोरात,
पतंग फडके डौलात !

काटाकाटीची गमंत,
खेळाची वाढे गमंत

                    --  उन्नती गाडगीळ