आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > आमच्याबद्दल

        ता. ना. पि. हि. नी. पा. जा. या सप्तरंगांचा एक सुंदर गोफ म्हणजेच इंद्रधनुष्य! हा निसर्गाचा चमत्कार! अनेक रंगांची, आकारांची, वासांची, रसांची सुंदर सुंदर फुले एकाच उपवनात दिसतात, त्याच प्रमाणे एका बालकात अनेक रंगांचे,  छटांचे, ढंगांचे मिश्रण दिसते. उदा. खोडकर पण मिश्किल, व्रात्य पण स्तुत्य, बेरकी पण लडिवाळ, घाबरट पण उद्योगी, अवखळ पण प्रेमळ, हट्टी - जिद्दी पण प्रयत्नवादी म्हणजेच अनेक रसांचे - रंगांचे एक रसायन म्हणजे बालक. "एक सप्तरंगी उपवण ".

        बाल्यातील प्रत्येक रसाला पोषक संस्कार करून त्यांचे अंतरंग खुलवणे , फुलवणे ... एक सुंदर गोफ बनवणे, हे काम कौशल्याचे आहे. बाल्याची एक एक पाकळी खुलवण्यासाठी एकेक रंग घेऊन बालपण.कॉम (baalpan.com) या स्वरुपात एक दालन खुलं करीत आहोत. शब्दरुपी फुलांची पखरण करत करत संस्कारमाला बनवण्याचा प्रयत्न आहे. या संस्कार सुमनांनी घराघरात ... मनामनात नंदनवन फुलावे हीच परमेश्वराजवळ इच्छा व्यक्त करीत आहोत.

        बालपण.काम हे दालन सर्वांसाठी खुले आहे. प्रत्येकाकडून हसत खेळत संवाद साधत ... सूचना, अपेक्षा, विचार , प्रतिसाद मत इ. "रिटर्न गिफ्ट" ची अपेक्षा आहे. सर्वांच्या सहकार्याने, सहभागाने हे जाळ मजबुत विणायचे आहे.