आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > सामाजिक > लेख / कथा

लेख / कथा


 • आत्मन: आत्मनैव गुरुः
  गुरु हा स्वतः प्रेरक, सूचक, वाचक, दर्शक, बोधक आणि शिक्षक असावा. बालकांच्या शारीरिक - मानसिक - नैतिक विकास होण्यासाठी आधी आपण अनंत कला - विद्या आत्मसात करून 'गुरु' बनूया ! बालकांना घडवणे हे एक उत्तम कर्म आहे. अन त्यासाठी सतत जागृत प्रयत्न करणे हा गुरुधर्म आहे. पुढे वाचा...
 • बाल दिंडी चालली
  आषाढ मेघांचे गर्जती टाळ, रिमझिम धारांची चिपळी मंजूळ । अबीर फुलांचे गंधित पाट, उजळली बाल पालखीची वाट । जय हरी विठठल… श्री हरी विठठल | पुढे वाचा...
 • दिव्य चक्षु
  संजय आता संगीत व संगणक शिक्षक आहे. लौकिकार्थाने त्याला चक्षु नाहीत पण एक दिव्य चक्षु त्याच्या कडे आहेत तो म्हणजे मन:चक्षु ! या दिव्यचक्षुच्या जोरावर ही डोळस (अंध) माणसे ता-याप्रमाणे चमकतील ! ता-याला कुठे दिसते आपण चमकतो ते ! अगदी तसंच ! मन सामर्थ्य हेच जीवन होय ! पुढे वाचा...
 • म्हातारी आणि बिबळ्या - पर्यावरण सुसंवाद
  बिबळ्या : म्हातारे --म्हातारे --- खाऊ का तुला ? म्हातारी : नको रे बाबा ! लेकीकडे जाईन net surfing करेन, प्राण्यांचे पर्यावरणाचे आणि पाण्याचे संरक्षण कसे करावे ते शिकेन जंगले वाचविन ! मग तू मला खा ! बिबळ्या : तू आमचे व वनाचे रक्षण करणार ! म्हणजे तू मानव नाही, देव दूत आहेस ! जंगलाचा व आमचा नाश करणाऱ्या मानवाचा मी नाश करणार ! तू खुशाल जा ! पुढे वाचा...
 • राजमाता जिजाबाई भोसले
  ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. पुढे वाचा...
 • माता एक - स्त्रोत अनेक
  पूर्वीच्या काळी माता म्हणजे खस्ता खाणे, सतत घाण्याला जुंपलेल्या, बैलाप्रमाणे केवळ कष्टकर्ती होती. आता मात्र मात या शब्दाचा परीघ विस्तारला आहे. आता शारीरिक कष्टाबरोबरच बौध्दिक विचार ती करते. माता कधी बनायचे ? इथपासून बालसंगोपन, स्वसंरक्षण, आरोग्य … आहार … विहार … स्वावलंबन - आर्थिक नियोजन इ. चे अधिकार ती वापरते ! त्यामुळे कुटुंब मर्यादित ठेऊन बालकांचा सर्वांगीण विकास या बद्दल ती स्वतःची मते मांडू शकते. पुढे वाचा...
 • एक आदर्श माता
  आज ती आई झाली! तेव्हा मातृत्वासाठी आसुरणे, झुरणे,वाटबघणे आणि अचानक मिळालेंला खजिना, आनंद, त्यामागील त्याग, त्यागातून निर्माण झालेली परदुःखाची भावना, त्या भावनेवर फुंकर घालणे. स्वतः मिटून जावून दूस-याला फुलू देणे! खुलवणे ! देण्यातील आनंद, सर्व सर्व संवेदना. . . त्यातील वेदना. . . त्यातील भावना . . .जाणीवा . . . सर्वा-सर्वांचा एक सुंदर, लोभस गोफ दोन माता-पित्यांच्या रूपाने तिच्या भोवती गुफला आहे. पुढे वाचा...
 • कामगार दिन
  कामगार याचा अर्थ काम करणारा … कष्ट करणारा तो कामगार ! मग तो मालक असो वा सेवक ! कार्यक्षमता … कार्यानिष्ठता महत्वाची ! स्वयंसिद्धता महत्वाची ! आपण आपल्या घरातील बालकांना बालपणापासूनच कार्यक्षम बनवूया … त्यांच्या वयानुसार छोटी छोटी कामे त्यांना करायला लावूया … प्रत्येक काम स्वतःचे स्वतः केल्याने मुलांची उर्जा वाढते. शारीरिक श्रमाने मनाची शक्ती वाढते. आपले घर हि एक प्रयोगशाळा आहे. त्यातील प्रत्येक काम आनंदाने, सहकारी वृत्तीने करावे ही शिकवण मुलांना देऊया. पुढे वाचा...
 • जागतिक पुस्तक दिन
  बालकाला बालवाचना पासून - चित्रमय भाषेपासून ग्रंथवाचनाकडे नेणे हि एक कला आहे. प्रत्येक बालकाने या कलेत पारंगत होणे, बालकाला एक वाचक - निरीक्षक - अभ्यास बनविणे महत्वाचे! पुढे वाचा...
 • तना - मनाची गुढी
  प्राण म्हणजे चैतन्य ! याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली. ब्रम्ह म्हणजे सत्य, ज्ञान आणि अनंत ! निसर्गाची पूजा करणे, रक्षण करणे व त्यातील चैतन्य अंगीकारणे म्हणजे गुढी-पाडवा साजरा करणे ! याच दिवशी भूमीची मशागत करतात. तन काढणे, रक्षण करणे, क्षेत्र रक्षणकर्ता शेतकरी हा पालक आणि पिके हि बालके ! पुढे वाचा...
 • प्रार्थना
  समोरच्या डोंगराने धुक्याची शाल लपेटली होती. एरवी Shorts आणि Shirts घालणारे, हात जोर-जोरात हालवत, मजेत चालणारे सत्तरीतील नवजवान आज फक्त नाक-तोंड उघडे ठेऊन, फुलपँट, स्वेटर, मफलर घालून तोंडाने ह… ची बाराखडी म्हणत Morning Walk करत होते. थंडीने प्रत्येकाच्या तोंडातून वाफा निघून हवेमध्ये एक मजेदार नक्षी तयार होत होती. पुढे वाचा...
 • जिद्दी लाल
  स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी सैनिकांची व शेतकी विकासासाठी कृषीवलांची गरज आहे हे ओळखून 'जय जवान - जय किसान' नारा पुकारला. त्या दृष्टीने शेतकी विकास तंत्र अवलंबिले. त्यांच्या घोषणेतून त्यांच्या दृष्टेपणा दिसतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान ! पुढे वाचा...
 • लै ग्वाड वाटतया मनाला
  परकर - पोलका घालणारी ढोरांमागे धावणारी ल्येक चालली साळंला, लै ग्वाड वाटतया मनाला । ढीगभर भाक-या थापणारी श्येन गोळा करणारी ल्येक चालली साळंला, लै ग्वाड वाटतया मनाला । पुढे वाचा...
 • बालकांचा संकल्प
  नवीन वर्षात काय मी करणार ? पुस्तकाच्या गुहेत हळूच मी शिरणार वाचून वाचून फडशा पाडणार । कुंडीत चार चार झाडे मी लावणार रोज रोज त्यांना पाणी मी देणार । पुढे वाचा...
 • क्रिसमस बद्दल थोडक्यात
  सातव्या शतकात एका भिक्षूने पहिल्यांदा त्रिकोणी फर वृक्षाचा उपयोग (सुचीपर्णी) सजवण्यासाठी केला. त्रिकोणानी त्याने ईश्वराच्या 'पिता-पुत्र-आत्मा' ह्या विद्यांना जोडले तेंव्हापासून त्रिकोणी ख्रिसमस ट्री चे महत्त्व निर्माण झाले. पुढे वाचा...
 • सांताक्लॉझ
  मुलांचा लाडका सांताक्लॉज फिनलॅन्डच्या लेपलॅन्ड प्रदेशात राहतो. रोवानिमी हे त्याच्या गावाचे नाव. "सांताक्लॉज गल्ली" त्याचे ऑफिसचे ठिकाण. इथे त्याला रोज भेटता येतं. पुढे वाचा...
 • तू लढत रहा !
  बालकांचे लैंगिक शोषण होते म्हणून मुलांना घरात बसवून ठेवले तर अपराधी सोकावेल व मुले कोमेजतील. सहकार वृत्ती वाढली तर उलट अपराधीच स्वतः ला कोंडून घेयील, समाज कंटकाना सभोवतालचा धाक वाटला पाहिजे आणि मुलांना शेजार-पाजारचा आसरा वाटला पाहिजे. आपल्या परिसरातील हिरवी कोवळी पाती जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मुल हे सर्वांचे आहे हि भावना रुजणे तितकीच जरुरी आहे. पुढे वाचा...
 • स्वस्ताई ची कमाल
  रसाच्या मिश्या पुसत पुसत देवाजवळ उभा राहिलो व आईने सांगितलेले पुट्पुटलो, "फक्त स्वत:पुरात बघण्याची बुद्धी देऊ नको, आजच्या प्रमाणेच सतत सर्वांसाठी करत राहीन!", आईने मला जवळ घेतले. आहे कि नाही, दहा रुपयाची धमाल अन स्वस्ताईची कमाल ! पुढे वाचा...
 • भोंडला
  हिरव्यागार धरेला उसळत्या सागराला उंच उंच पर्वत राशींना चिडवत- चिडवत, उंच भरारी घेणाऱ्या पक्ष्यांना खिजवत, आमचे विमान ३०००० फुटांपेक्षाही जास्त उंचीवर भ्रमण करत होते. काही वेळातच पाऊस सुरु झाला. नाजूक रेशीम धारांचे एक पटल तयार झाले. त्या पारदर्शक पटलात घुसून त्याला पार करून तेजस्वी सूर्यकिरण काळ्या मेघांवर आपटत होते. पुढे वाचा...
 • लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव
  इंग्रजांचे अंध अनुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल लोकमान्य टिळकांना अत्यंत चीड होती. त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांचा धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे, असे त्यांचे मत होते. पुढे वाचा...