आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > दिन-विशेष

गुढी पाडवा

गुढी पाडवा                 हिंदू वर्षांतील पहिला दिवस गुढी पाडव्यापासून सुरु होतो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. पुराणात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून हा दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात.

पुराणात या दिवसाचे महत्व अनेक पद्धतीने सांगितले जाते,
  • ब्रम्ह देवाने या दिवशी विश्व निर्माण केले, असे मानले जाते.
  • रामाने चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला होता.
  • शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू केले.
ह्या शुभ गोष्टी याच दिवशी घडल्या म्हणून घरोघरी वर्ष प्रतिपदेच्या दिवशी वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच गच्चीवर लावून आनंद साजरा करतात. या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षात सहकार्य करण्याचा संकल्प करावा व शुभेच्छा व्यक्त कराव्यात.

गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी हे स्वागताचे प्रतीक आहे.