आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > सण - उत्सव > हिंदूंचे सण आणि उत्सव

 

 • स्वातंत्र्यदिन
  भारतीय स्वातंत्र्यदिवस प्रतिवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. पुढे वाचा...
 • धनत्रयोदशी
  आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस हा सण साजरा केला जातो. समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रगट झाली तसेच धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. पुढे वाचा...
 • ख्रिसमस (नाताळ)
  नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्वपूर्ण सण आहे. २५ डिसेंबर, येशुंचा जन्मदिवस - दरवर्षी याच दिवशी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. नाताळ हा आनंद व हर्षोल्साचा सणं आहे. पुढे वाचा...
 • पोळा
  श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सण म्हणजे 'पोळा.' या सणाला "बैलपोळा" असेही म्हणतात. पुढे वाचा...
 • श्री गणेश चतुर्थी
  भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. "गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया" या जय घोषाने संपूर्ण जन-सागर गणपती बाप्पाच्या आगमनात बुडून जातो. पुढे वाचा...
 • कोजागरी पौर्णिमा
  शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रधा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं. पुढे वाचा...
 • वसुबारस
  हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. पुढे वाचा...
 • नरक चतुर्दशी
  नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. पुढे वाचा...
 • मकरसंक्रांत
  तिळांना वाजली खूप खूप थंडी, अंगात घातली साखरेची बंडी! काटे लागले टोचायला, हलवे लागले पळायला! केशरी हिरव्या रंगात पडले, एकमेकात मिसळून गेले! खो-खो-खो-खो हसत सुटले, गोड गोड बोल बोलत राहिले! पुढे वाचा...
 • होळी
  आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. पुढे वाचा...
 • गुढी पाडवा
  चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात! पुढे वाचा...
 • राम नवमी
  मनुष्याने केवळ राम बनण्याचे ध्येय आणि आदर्श समोर ठेवावा. 'सदगुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम!' हे सर्व गुण स्वत: अंगीकारून प्रत्येकाने राम बनण्याची महत्त्वकांक्षा मनात ठेवावी.पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे राज्य असणे, हे खरे रामराज्य होय. पुढे वाचा...
 • अक्षय तृतीया
  वैशाख शुद्ध तृतीयेला त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. त्याचप्रमाणे चार युगांपैकी सुरुवातही याच दिवशी झाली, म्हणूनही हा अतिशय शुभदिन मानला जातो. आपल्या संस्कृतीत महुर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे, योग्य मुहूर्तावर सुरु केलेल्या कार्यात हमखास यश मिळते अशी घट्ट समजूत आहे. म्हणूनच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्यतृतीयेला महत्त्व आहे. पुढे वाचा...
 • गुरुपौर्णिमा
  वर्षभरात ज्या काही १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा. पुढे वाचा...
 • रक्षाबंधन
  या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. पुढे वाचा...
 • श्रीकृष्णजयंती
  श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला बुधवारी रात्री बारा वाजता रोहिणी नक्षत्रावर झाला. कंसाची बहिण देवकी व वासुदेव यांचा कृष्ण हा आठवा मुलगा होता. हा दिवस कृष्णजयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. पुढे वाचा...
 • नवरात्रोत्सव
  अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. ह्या नवरात्रींत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्त्रोत्रं म्हटली जातात. पुढे वाचा...
 • दसरा
  दसरा म्हणजेच विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस. पुढे वाचा...
 • आषाढी एकादशी व पालखी सोहळा
  महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर, तुकाराम या महान संताशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेलेला आहे. एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून तर देहुहून संत तुकाराम महाराजांची पालखी दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात. महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो पुढे वाचा...