आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > छोट्यांसाठी खास पाक-कृती > खाऊचा डब्बा

खाऊचा डब्बा

                         पोषण आणि संवर्धन याबरोबर रोगप्रतिकार ही अन्नाची महत्वाची कार्ये असल्याने त्यालाच प्रथम प्राधान्य देऊन डब्यातील पदार्थांची योजना करावी.

खाऊच्या डब्यात (मधल्या वेळच्या) काय असावे?

 १. शक्यतो पोळी- भाजी किंवा भाजी -भाकरी असावी.
२. वरचेवर उसळी असाव्यात मोड आणून उसळी कराव्या.
३. फ्लॉवर , बीट, गाजर, मुळा, या भाज्यांचा पाला बारीक करून डाळीसह भाजी बनवून द्यावी.
४. एखादे फळ रोज द्यावे. आवळा, पेरू, चिकू, पपई केळी ही फळे नेहमी सहज उपलब्ध होतात.
५. वरी, नाचणी अशा धान्यांचा वापर करून त्यांचे पदार्थ डब्यात द्या.
६. पोळीबरोबर गोड आवडणार्‍या मुलांना तूप व गूळ द्यावे.
७. बदल म्हणून डब्यात खजूर, गूळ शेंगाचा लाडू, चिक्की, चणे कुरमुरे असे पदार्थ आवर्जून द्यावे.
८. निरनिराळ्या भाज्यांचा समावेश असलेले पराठे मेथी पराठा, आलु पराठा इ. या भाज्यांनी युक्त पुर्‍या ही बनवता येतात. त्यामुळे मुलांना खायला आवडतील आणि बदलही होईल, पोषण मूल्यही जपले जाईल.
९. शेंगादाने, लसूण, खोबरे, डाळी, यांच्या चटण्या नेहमी पोळी/भाकरी बरोबर द्या. कच्या भाज्यांचे सॅलेड द्यावे.
१०. इडली, ढोकळा, थालीपीठ, असे पदार्थ द्यावेत. गोड आवडणार्‍यांसाठी लाडू, शिरा, घरात केलेली बालूशाही, पेढे असेही पदार्थ डब्यात द्यावेत.
११. अनेक धान्यांची पिठे एकत्र करून काही पदार्थ बनविता येतात. त्यांचा समावेश डब्यात करावा.
१२. निरनिराळ्या भाज्यांपासून बनविलेल्या वड्या तिखट/ गोड करून द्याव्यात अशा रितीने विविधतेने पदार्थाची योजना केली तर मुले आवडीने खातील.

 • शेल केक
  एका भांड्यात थोडे पाणी गरम करा. त्यात कॉफी पावडर घाला व उकळून गाळा. हे पाणी थंड करायला ठेवा. एका बोल मध्ये कोको पावडर व पिठी साखर अंदाजाने घाला. त्यात मावेल तेवढे तूप (वितळलेले) घालून मिश्रण चांगले फेसा. पुढे वाचा...
 • सोयाबीन कटलेट
  सोया ग्रनुअल्स शिजवून घेऊन त्यातले पाणी काढून टाका. बटाटा चांगला मॅश करून घ्या. एका पसरट भांड्यामध्ये सोया ग्रनुअल्स, मुग, बटाटा, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या. पुढे वाचा...
 • तांदळाचा ढोकळा
  तांदूळ आणि डाळ वेगवेगळ्या भांड्यामधे भरपूर पाण्यात ४-५ तास भिजत ठेवा. नंतर तांदूळ आणि डाळ मिक्सर मधे चांगले बारीक करून घ्या. हे मिश्रण ४-५ तास गरम जागेत ठेवा. हे मिश्रण इडली पीठासारखे आंबू देऊ नये. पुढे वाचा...
 • मजेदार कटलेट्स
  कांदा बारीक चिरुन घ्यावा व थोड्या तेलावर परतवून घ्यावा. आले व मिरच्याही बारीक चिराव्यात.नंतर रवा सोडून इतर सर्व वस्तू एकत्र कराव्यात व त्याचे लिंबाएवढे गोळे तयार करावेत. पुढे वाचा...
 • पौष्टिक थालिपीठ
  प्रथम किसलेल्या सर्व भाज्या एकत्र करा. नंतर त्यामध्ये तांदुळाचे पीठ , भाजणीचे पीठ ,हिरवी मिरची ,कोथिंबीर पेस्ट, तीळ, ओवा ,थोडीशी हळ्द, मीठ चवीपुरते घालून पीठ भिजवून घ्या. पुढे वाचा...
 • मिश्र-डाळींचा ढोकळा
  सर्व डाळी व तांदुळ वेगवेगळे भिजत घाला, नंतर मिक्सरवर बारीक़ करून ह्या मिश्रणात,हिरवी मिरची पेस्ट ,साखर ,मीठ , हळ्द घाला व चांगले ढवळुन घ्या. असे पदार्थ मुलांच्या डब्यात दिल्यास मातेचे कर्तुत्व आणि मातृत्व दोन्हीचा परिणाम होऊन मुलांचे पोषण चांगले होईल. पुढे वाचा...