आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > संस्कार

                      " मानवी आकाराला सुंदर वळण देणे म्हणजे संस्कार !  "

          अनेक श्लोक शिकवणे, स्तोत्रे पाठ करून घेणे म्हणजेच केवळ संस्कार नाहीत, तर पंचेद्रीयांना सक्षम, कार्यक्षम बनवणे, बडबड गीतातून आई आणि बाळ यांत संवाद निर्माण होतो व तेथूनच बाळ "भाषा" शिकत ! संवादातून श्रवण संस्कार, चक्षू संस्कार, वाचा संस्कार, श्वसन संस्कार, खाद्य संस्कार, लेखन, वाचन, मनन, चिंतन हळूहळू एकेक पायरी चढली जाते. संवादातून भाषा समृद्ध होते.शब्द भांडार वाढते. लय,सूर,ताल याची जाणीव होते. परिसराची ओळख होते. इतिहास ज्ञात होतो. भूगोलाची जाण होते. संवादामुले भय नष्ट होते, जिज्ञासू वृत्ती वाढते.
           
             संस्कार हे शिकवून, हाताला धरून होत नाहीत. तर छोट्या छोट्या प्रसंगातून चालताना . . . उठताना . . . बसताना . . . निरीक्षणांनी मनावर ठसतात. संस्कार घडणे, घडवणे हि प्रक्रिया जन्मभर चालूच राहते!

            संस्कार मनावर बिंबवायला वय, वेळ, काळ, स्थान, स्थिती इ. चे बंधन नसते.

आपणही संस्कार झाल्याचे प्रसंग, संस्कार कसे करावे, वागणूक इ. बद्दल सूचना, लेख आमच्या सोबत share करा.