आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > पाक-कृती

                आज काल बऱ्याच मातांची तक्रार असते कि त्यांची मुले पुरेश्या भाज्या खात नाहीत, व्यवस्थित जेवत नाहीत, वगैरे वगैरे...
तुम्ही जर एखादा पदार्थ वारंवार डब्यातून देत गेलात, तर मुले ही कंटाळणारच. मुले आज काल फार choosy झालीत, तेच तेच खायला कंटाळा करतात. अशा वेळेस खरी फजिती होते ती आईची ! "सारखेच काय बरे नविन नविन बनवावे?" अशीही तक्रार बऱ्याच माता करतात. एकंदरीत काय तर थोडेसे कष्ट घेऊन आपल्याला तोच पदार्थ आकर्षक बनवून पोषक असे मुलांना खाण्यास द्यायचे आहे.
             
              बालपणच्या पाक-कृती या सदरात आम्ही आई आणि मुल या दोघांसाठी ही सोप्या, आकर्षक आणि पोषक अश्या काही Recipes आणि टिप्स घेऊन येत आहोत. आपणाकडेही अशा काही Recipes अथवा Tips असतील तर आमच्या बरोबर नक्की share करा.

 • नारळी भात
  तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत. पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करावे. लवंग घालून काही सेकंद परतावे. निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनीटे मध्यम आचेवर परतावे. तांदूळ परतत असतानाच दुसर्‍या गॅसवर दिड कप पाणी गरम करावे. पुढे वाचा...
 • गुळपोळी
  पिठांचे प्रमाण आवडीनुसार बदलू शकतो. जर तुम्हाला खुडखुडीत पोळी हवी असेल तर मैदा जास्त आणि कणिककमी वापरावी तसेच गरम तेलाचे मोहनही घालावे. जर थोडी नरम पोळी हवी असेल तर फक्त गव्हाचे पिठ वापरावे आणि थंड तेलाचेच मोहन घालावे. पुढे वाचा...
 • दुधीचे काप
  प्रथम काप सोडून सर्व एकत्र मिसळावे. एकेक काप मिश्रणात दाबून दाबून घोळवून घ्यावे. नंतर एकेक fry pan मध्ये जरा जास्तच तेल सोडून खरपूस भाजणे ( वांग्याच्या काप प्रमाणे करणे ) पुढे वाचा...
 • उपवास ढोकळा
  प्रथम वऱी तांदूळ पीठ + दही हे पाणी घालून भिजवून २ तास ठेवावे. नंतर करताना आले + मिरची + जिरे पेस्ट, भिजवलेला साबुदाणा, चवीनुसार मीठ घालून ढोकळयासाठी सरसरीत भिजवून घ्या. पुढे वाचा...
 • अपसाइड-डाउन केक
  अननसाच्या चकत्या फडक्यावर दोन तास पसरून सुकत ठेवाव्यात. केकच्या भांड्याला नेहमीप्रमाणे सर्व बाजूंनी डालडा व मैदा लावतो, तसे न करता फक्त बाजूंनीच डालडा व मैदा लावावा. खाली फक्त डालडाच लावावा. पुढे वाचा...
 • केळ्याची भाकरी
  एका भांडयात ज्वारी-बाजरी पीठ + चिरलेली मेथी +जिरे +मिरे पूड + बडीशेप पावडर + लाल मिरची पावडर + तीळ + पिठीसाखर + चवीनुसार मीठ एकत्र चांगले मिश्रण करून घ्या. नंतर केळीचा कुस्करून लगदा करून त्यात वरील एकत्रित मिश्रण मावेल तेवढे घालून पाणी अथवा दुधाचा वापर करून गोळा मळावा त्याची भाकरी थापावी. पुढे वाचा...
 • खजूर रोल
  खजूर हे उर्जायुक्त, लोहयुक्त आणि रक्तवर्धक असा पोषक असते. थंडीत आहारात याचा उपयोग आपल्यास नक्कीच लाभदायक ठरतो. एक अतिशय पौष्टिक आणि करण्यास सोपी अशी खजूर रोलची पाक-विधी तुम्हाला नक्कीच आवडेल पुढे वाचा...
 • डाळिंबाचे गरम सूप
  थंडीत फळे गार गार असल्याने खाल्ली जात नाहीत. डाळींब हे लायकोपेन यूक्त असते त्यामुळे हृदय व लाल पेशींचे संरक्षण करते. तसेच डाळींब हे रोग निवारक आणि प्रजोत्पादक देखील असते. डाळींब लोह व तंतुमय असल्याकारणाने त्याचा आहारात समावेश जरूर करावा. थंडीत भाजी बरोबर फळांचा गरम पदार्थात वापर करावा. पुढे वाचा...
 • बाजरी लाडू
  बालकांसाठी थंडीत बाजरी आहारात असावी. बाजरी उर्जा-युक्त, बल-वर्धक आणि कॅल्शियम-युक्त आहे. रक्त पोषक आहे. डायबेटीस, क्षय रोगांवर देखील उपयुक्त मानली जाते. पुढे वाचा...
 • मसाला दुध
  दूध गरम करावे. त्यात१/२ कप किंवा गरजेनुसार साखर घालावी. ३-४ टिस्पून मिक्सरवर एकत्र करून घेतलेला मसाला घालून ढवळावे. थोडे उकळू द्यावे. दुध थोडेसे आटवावे. गरम गरम दुध सर्वांना द्यावे. मसाल्यात जायफळ प्रमाणातच वापरावे. कारण मसाला दुधाला जायफळाचा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते. पुढे वाचा...