आपले स्वागत आहे

पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचे संगोपन कसे करतात? कसे करायला हवे? इ. विषयांवर आपले मत बालपण.कॉम वर मांडू शकता.

आपण आपल्या लिखाणातून बालपणच्या या उपवनात आपल्या विचारांचे नव-नवीन रोपे रोवावीत व या उपवनाची अधिकाधिक शोभा वाढवावी.

येण्याची नोंद

   नविन पासवर्ड मागवा

बालपण.कॉम चे सदस्य व्हा.

 
मुखपृष्ठ > पाक-कृती

                आज काल बऱ्याच मातांची तक्रार असते कि त्यांची मुले पुरेश्या भाज्या खात नाहीत, व्यवस्थित जेवत नाहीत, वगैरे वगैरे...
तुम्ही जर एखादा पदार्थ वारंवार डब्यातून देत गेलात, तर मुले ही कंटाळणारच. मुले आज काल फार choosy झालीत, तेच तेच खायला कंटाळा करतात. अशा वेळेस खरी फजिती होते ती आईची ! "सारखेच काय बरे नविन नविन बनवावे?" अशीही तक्रार बऱ्याच माता करतात. एकंदरीत काय तर थोडेसे कष्ट घेऊन आपल्याला तोच पदार्थ आकर्षक बनवून पोषक असे मुलांना खाण्यास द्यायचे आहे.
             
              बालपणच्या पाक-कृती या सदरात आम्ही आई आणि मुल या दोघांसाठी ही सोप्या, आकर्षक आणि पोषक अश्या काही Recipes आणि टिप्स घेऊन येत आहोत. आपणाकडेही अशा काही Recipes अथवा Tips असतील तर आमच्या बरोबर नक्की share करा.

 • अडई डोसा
  भिजवलेल्या डाळी निथळून वाटणे. त्यात वरील मसाला वाटण घालून वाटणे. कोथिंबीर बारीक चिरून घालणे. निर्लेप तव्यावर एक थेंब तेल घालून ते पुसून घ्यावे व डोसा घालावा. मग डोस्यावर थेंब- थेंब तेल सोडावे. कमी वेळेत कमी तेलात कुरकुरीत डोसे तयार ! पुढे वाचा...
 • उकडीचे मोदक
  वाटीचा आकार देवून त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, सात किंवा नउ अशा पाडाव्यात. पुढे वाचा...
 • अंजीर मोदक
  कमी उष्ण्ते वर घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. आता त्यात वेलची पुड टाकुन ढवळावे. आता हे मिश्रण मोदक साच्यात घालून मोदक पाडून घ्यावेत. ह्या मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे पेढेदेखील बनवू शकतो. वरुन बदाम काप टाकुन सजवू शकता. पुढे वाचा...
 • शेल केक
  एका भांड्यात थोडे पाणी गरम करा. त्यात कॉफी पावडर घाला व उकळून गाळा. हे पाणी थंड करायला ठेवा. एका बोल मध्ये कोको पावडर व पिठी साखर अंदाजाने घाला. त्यात मावेल तेवढे तूप (वितळलेले) घालून मिश्रण चांगले फेसा. पुढे वाचा...
 • गोपालकाला
  जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर बरेच श्रीकृष्ण भक्त भगवान विष्णूच्या आवडीचे निरनिराळे पदार्थ बनवितात. आणि मग जन्माष्टमीच्या मध्यरात्री हे निरनिराळे पदार्थांचे भगवान श्रीकृष्ण यांना नैवेद्य दाखवून आवाहन केले जाते. यामध्ये भरपूर मिष्टनांचा समावेश केलेला असतो. त्यापैकी एक स्वादिष्ट पदार्थ "गोपालकाला" आहे. जन्माष्टमीचा सण साजरा करणा-या बहुतांशी घरात गोपाळकाला केलेला आढळेल. बनविण्यास अत्यंत सोपा आणि खाण्यास रुचकर असा हा अत्यंत पौष्टिक गोपालकाला कसा बनवायचा? चला पाहूया... पुढे वाचा...
 • मिल्क बर्फी
  थोडेसे दूध गरम करून त्यात ३ टिस्पून लिंबाचा रस टाकून दुध फाडून घ्यावे. नंतर एका मलमलच्या कपड्यात बांधून ठेवावे. जवळजवळ ३ तासानंतर उघडून पाहिल्यास त्याचे चांगले चीज तयार झालेले मिळेल. पुढे वाचा...
 • चॉकलेट बर्फी
  एका कढाई मध्ये किसलेला १ किलो खवा कोरडा होईपर्यंत भाजून घ्या. साखर घालून पुन्हा शिजवावा. वेलची पूड घालून चांगला मिक्स करून घ्या. तयार मिश्रणाचे २ समान भाग करा. पहिल्या भागात चॉकलेट मिक्स करावे. पुढे वाचा...
 • कोबी आणि गाजर भुजिया
  एका जाड पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि १ सुकी मिरची तळून घ्या. त्यातच कोबी आणि गाजराचे काप टाका. आता कमी उष्णतेवर हे मिश्रण तळू द्या. पुढे वाचा...
 • सोया पराठा
  एका भांड्यात गव्हाच्या पिठाची मीठ घालून सैलसर कणिक मळून घ्या व थोड्या वेळेसाठी बाजूला तूप लावून बाजूला ठेऊन द्या. एका नॉन स्टिक तव्यावर अनारदाणा, धने थोडेसे भाजून घ्या. पुढे वाचा...
 • रंगीबेरंगी पचडी
  हि रंगीत पचडी मुलांना वरण्-भात, मेतकूट तूप मीठ भात, खिचडी बरोबर खायला द्या. ही खूप पौष्टीक आहे. ही सलाड च्या रूपात पण जाउ शकते. पुढे वाचा...