आज काल बऱ्याच मातांची तक्रार असते कि त्यांची मुले पुरेश्या भाज्या खात नाहीत, व्यवस्थित जेवत नाहीत, वगैरे वगैरे...
तुम्ही जर एखादा पदार्थ वारंवार डब्यातून देत गेलात, तर मुले ही कंटाळणारच. मुले आज काल फार choosy झालीत, तेच तेच खायला कंटाळा करतात. अशा वेळेस खरी फजिती होते ती आईची ! "सारखेच काय बरे नविन नविन बनवावे?" अशीही तक्रार बऱ्याच माता करतात. एकंदरीत काय तर थोडेसे कष्ट घेऊन आपल्याला तोच पदार्थ आकर्षक बनवून पोषक असे मुलांना खाण्यास द्यायचे आहे.
बालपणच्या पाक-कृती या सदरात आम्ही आई आणि मुल या दोघांसाठी ही सोप्या, आकर्षक आणि पोषक अश्या काही Recipes आणि टिप्स घेऊन येत आहोत. आपणाकडेही अशा काही Recipes अथवा Tips असतील तर आमच्या बरोबर नक्की share करा.
-
स्टीम्ड पॅटिस
शिवरात्री पासून उसाची गु-हाळे सुरु होतात. ऊस हा उर्जावार्धक आहे. बालकांना उसाचे कर्वे दाताने चावण्यास - व चघळायला दिल्याने त्यांचे दात मजबूत होण्यास मदत होते. आक्रोड हे एक मैगेनीज आहे. मेदुला पोषक, बलवर्धक आहे. तसेच ओमेगा ३ हे फायबर युक्त असून हृदयास उत्तम आहे. पुढे वाचा... -
सोयाबीन कटलेट
सोया ग्रनुअल्स शिजवून घेऊन त्यातले पाणी काढून टाका. बटाटा चांगला मॅश करून घ्या. एका पसरट भांड्यामध्ये सोया ग्रनुअल्स, मुग, बटाटा, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या. पुढे वाचा... -
मेथी नाचणी सूप
सगळ्यात आधी एक कप पाण्यात नाचणीचे पीठ कालवून पातळ पेस्ट तयार करा. एका भांड्यामध्ये तूप गरम करून त्यात लसुणाची फोडणी करून ओवा, थोडे मीठ आणि मेथी टाका. मेथी थोडी हलवा आणि २-३ मिनिटे शिजू द्या. पुढे वाचा... -
तांदळाचा ढोकळा
तांदूळ आणि डाळ वेगवेगळ्या भांड्यामधे भरपूर पाण्यात ४-५ तास भिजत ठेवा. नंतर तांदूळ आणि डाळ मिक्सर मधे चांगले बारीक करून घ्या. हे मिश्रण ४-५ तास गरम जागेत ठेवा. हे मिश्रण इडली पीठासारखे आंबू देऊ नये. पुढे वाचा... -
झटपट पौष्टिक लोणचे
आवळा व ओल्या हळदीचा मौसम आता संपत आला आहे. तेव्हा, मैत्रिनिनो , हे झटपट लोणचे झटपट करा व आपल्या मुलांना स्प्रेड म्हणून पोळी, पाव, डोसा वर घालून खायला द्या. यातील सर्व भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्वे आहेत. पुढे वाचा... -
मजेदार कटलेट्स
कांदा बारीक चिरुन घ्यावा व थोड्या तेलावर परतवून घ्यावा. आले व मिरच्याही बारीक चिराव्यात.नंतर रवा सोडून इतर सर्व वस्तू एकत्र कराव्यात व त्याचे लिंबाएवढे गोळे तयार करावेत. पुढे वाचा... -
बदामाचा हलवा
बदाम पाण्यात ६-७ तास भिजवावे व सोलून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटतांना पाणी कमीत कमी घालावे. एका कढईत तूप टाका व वाटलेले बदाम टाका. मंद आचेवर ठेऊन भाजा. भाजतांना सारखे हलवत रहा. पुढे वाचा... -
पौष्टिक थालिपीठ
प्रथम किसलेल्या सर्व भाज्या एकत्र करा. नंतर त्यामध्ये तांदुळाचे पीठ , भाजणीचे पीठ ,हिरवी मिरची ,कोथिंबीर पेस्ट, तीळ, ओवा ,थोडीशी हळ्द, मीठ चवीपुरते घालून पीठ भिजवून घ्या. पुढे वाचा... -
मिश्र-डाळींचा ढोकळा
सर्व डाळी व तांदुळ वेगवेगळे भिजत घाला, नंतर मिक्सरवर बारीक़ करून ह्या मिश्रणात,हिरवी मिरची पेस्ट ,साखर ,मीठ , हळ्द घाला व चांगले ढवळुन घ्या. असे पदार्थ मुलांच्या डब्यात दिल्यास मातेचे कर्तुत्व आणि मातृत्व दोन्हीचा परिणाम होऊन मुलांचे पोषण चांगले होईल. पुढे वाचा... -
मेथीचे लाडू
पोषणमूल्य योग्य ठेवून रूचकर असे मेथी लाडू मुलांच्या पोषणाला नक्कीच मदत करतात. पुढे वाचा...